Covid Booster Dose: कोरोना लसीचा मुंबईकरांना घ्यावा लागेल तिसरा डोस? Saam Tv
मुंबई/पुणे

Covid Booster Dose: कोरोना लसीचा मुंबईकरांना घ्यावा लागेल तिसरा डोस?

मुंबईकरांच्या शरीरात प्रतिजैविकं किती प्रमाणात तयार झाली आहेत, याबाबत सेरोसर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर गरज पडल्यास बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली असली, तरी पूर्णपणे कोरोना मुंबईतून हद्दपार झालेला नाही. सध्या लसीकरण हा एकमेव कोरोनावर उपाय असून लसीकरण लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे मुंबईत खासगी तसेच शासकीय अश्या मिळून ४६१ लसीकरण केंद्रावर लसीकरण केलं जातंय. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या १८ वर्षावरील नागरिकांची संख्या ९२ लाखांवर असून, त्यापैकी ९५% नागरिकांचा पहिला, तर ६३% नागरिकांचा दुसरा लसीचा डोस घेऊन झालेला आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरातच मुंबईकरांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण होतील अपेक्षा आहे.

हे देखील पहा -

मुंबईकरांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाले, तरी मुंबईकरांना लसीचा तिसरा, म्हणजे बूस्टर डोस देखील घ्यावा लागू शकतो. कारण कोरोना संबंधी पालिकेकडून सहावा सेरोसर्व्हे केला जाणार आहे. येत्या वर्षात जानेवारी महिन्यात हा सर्व्हे केला जाणार असून मुंबईकरांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी किती प्रमाणात प्रतिजैविकं तयार झाली आहेत का? याचा अभ्यास केला जाणार आहे. डोस घेणाऱ्यांच्या आणि डोस न घणाऱ्यांच्या शरीरातील कोरोनाशी लढण्यासाठीची रोगप्रतिकारक शक्ती किती आहे, याचा देखील अभ्यास केला जाणार आहे.

मुंबईकरांच्या शरीरात प्रतिजैविकं किती प्रमाणात तयार झाली आहेत, सेरोसर्व्हेतून अहवाल समोर आल्यानंतर गरज पडल्यास लसीचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस देखील मुंबईकरांना देण्याचा विचार केला जाणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे जानेवारी महिन्यात होणाऱ्या सेरोसर्व्हेवर मुंबईकरांना तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घ्यावा लागणार की नाही, ते स्पष्ट होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे लष्कर कोर्टाने स्वयंघोषित धर्मगुरु आरोपी ऋषिकेश वैद्यला ६ एप्रिलपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

Koliwada Masala: घरच्या घरी तयार करा कोलीवाडा मसाला; प्रत्येक भाजी बनेल रूचकर

Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

Devendra fadnavis : लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई; CM फडणवीसांचा कडक इशारा

Kharat Case : भोंदू खरातला ३९ आमदार भेटले, माजी मंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT