thane, football, vartaknagar saam tv
मुंबई/पुणे

Couple Thrashes Neighbours Son : पुत्रप्रेमापाेटी ठाण्यातील दाम्पत्याने दहा वर्षाच्या मुलाला बदडले

लवकरच दाम्पत्यावर कठोर कारवाई हाेईल अशी माहिती पाेलिसांनी दिली.

विकास काटे

Vartaknagar News : ठाणे शहरातील एका दाम्पत्यावर क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्याच्या दहा वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वर्तकनगर येथे घडली आहे. या प्रकरणी दाम्पत्यावर कठाेर कारवाई केली जाईल असे पाेलिसांनी (police) स्पष्ट केले आहे. (Maharashtra News)

वर्तक नगर परिसरातील एका हाऊसिंग सोसायटीच्या आवारात मुलं फुटबॉल खेळत हाेती. त्यावेळी दाम्पत्याच्या मुलाला चेंडू लागल्याची घटना ७ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जोडप्याने दहा वर्षांच्या मुलाला त्यांच्या घरातून मारहाण केली (Maha Couple thrashes neighbour's son in Thane booked).

त्यामुळे ताे मुलगा जखमी झाला. मुलाचे अंग काळं निळं होईपर्यंत मारहाण केल्याने संबंधित मुलाच्या पालकांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनूसार वर्तकनगर पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच लवकरच कठोर कारवाई करु असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT