पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण ! Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

कोथरुड येथील एमआयटीच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध लावत आहे. तरी, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्ता कुठे करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. परंतु, काही प्रमाणात शाळा, महाविद्यालयांमध्येही आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आहेत. पुण्यातील एमआयटीमध्ये तब्बल 13 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आत्ता जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोथरुड येथील एमआयटीच्या (MIT Pune) मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण आहे. राज्य शासनाने (State Government) दिलेल्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्गांसाठी प्रवेश दिला जात आहे. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेऊनसुद्धा ते करोना बाधित आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

महाविद्यालयात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असूनही कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाबधित आढळुन आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते.

हे देखील पहा -

एमआयटीचे कुलसचिव प्रशांत दवे (Prashant Dave) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'कॉलेजमध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश आहे. तर हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. त्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये (Workshop) स्पर्धेच्या तयारीसाठी प्रवेश दिला होता.

तर, एका बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 25 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्या 25 पैकी 13 पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर इतर आठ विद्यार्थी निगेटिव्ह आहेत. तर चार विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल अजून मिळालेला नाही. या 25 विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून इतरांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करूनच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातोय त्यामुळे कॉलेज सध्या तरी बंद होणार नाही,' अशी माहिती दवे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT