Corona Cases Update in Maharashtra| Covid Restriction Updates Saam TV
मुंबई/पुणे

राज्यात 1 एप्रिसपासून कोरोना निर्बंध मुक्तीची गुढी, मास्क वापरण्याचे नागरिकांना आवाहन

कोणत्या नियमात शिथिलता येऊ शकते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: गुढीपाडव्यापूर्वीच राज्यातील जनतेला अत्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यात चांगले यश येत असल्यामुळे 1 एप्रिलपासून राज्यातील कोविड निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार आहेत. कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर लावण्यात आलेले निर्बंध (Restrictions) देखील हटणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. मात्र, चीन व अन्य काही देशांतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन मास्क (Mask) व सोशल डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येणार आहे. (Corona Cases Update in Maharashtra)

राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला असून लवकरच याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची घटती रुग्णसंख्या विचारात घेता कोविड (Covid) संदर्भात लागू केलेले निर्बंध पूर्णत उठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 1 एप्रिलपासून राज्य कोरोना निर्बंधमुक्त होणार असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर वेगाने लसीकरण करण्यात येऊन बहुसंख्य लोकांनी लस घेतल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचे प्रमाणही बऱयाच प्रमाणात खाली आहे.

हे देखील पहा-

कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. मात्र, जनतेने मास्क वापरणे गरजेचे असल्याने तसे आवाहन शासनाच्या वतीने सतत करण्यात येणार आहे. तसेच याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेतल्याने कोविड निर्बंध न पाळल्याने होणारा दंडही पोलीस अथवा स्थानिक प्रशासन आकारू शकणार नाही. मात्र, राज्यात साथरोग नियंत्रण कायदा लागू राहील. रेल्वे प्रवासासाठी किंवा मॉल प्रवेशासाठी पूर्णतः लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे आहे.

मात्र, आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेतल्यानंतर हे बंधनही हटविण्यात येणार आहे. मात्र लसीकरण शंभर टक्के करण्याबाबत सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सध्या राज्यात लसीकरणाचा वेग चांगला आहे, त्याचबरोबर प्रमाणही समाधानकारक आहे. मात्र, तरीही राज्यातील अंदाजे नव्वद लाख ते एक कोटी लोकांनी अद्यापही लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे या लोकांनीही दुसरा घेण्याबाबत आवाहन आणि जनजागृती करण्यात येणार आहे.

गुढीपाडवा, रामनवमीसाठी लवकरच अधिसूचना

गुढीपाडवा आणि रामनवमी सणासाठी येत्या दोन-तीन दिवसांत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत येत्या 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत येत्या 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. त्यानंतर रामनवमी आहे. या दोन्ही सणांच्या निमित्ताने शोभायात्रा आणि मिरवणुकीला परवानगी देण्याची आणि निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वळसे-पाटील यांनी गुढीपाडवा आणि रामनवमीसाठी लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT