Corona पॉझिटीव्ह कळताच! पंतप्रधान मोदींचा फोन; खुद्द शरद पवारांना ... Saam Tv News
मुंबई/पुणे

कोरोना पॉझिटीव्ह कळताच! पंतप्रधान मोदींचा फोन; खुद्द शरद पवारांना ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि देशाच्या राजकारणामधील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि देशाच्या राजकारणामधील (politics) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला आहे. पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आल्यावर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरिता विविध क्षेत्रातील मंडळींकडून रीघ लागली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यावर तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

शरद पवार यांनी ट्विट (Tweet) करत याविषयी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी मला फोन (Phone) करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. माझ्या प्रकृतीची विचारपूस केल्याविषयी मी त्यांचे आभार मानतो, असे शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आज दुपारी आले आहे. स्वत: शरद पवार यांनी ट्विट करत यासंदर्भामध्ये माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Positive) आली आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. पण, मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ची टेस्ट करावी आणि आपली काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Maharashtra News Live Update: पावसासाठी शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड; वरुणराजाला साकडं घालत चक्क गाढवाचं लग्न!

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT