महाराष्ट्र पोलिसांवर कोरोनाचे संकट; आठवड्याभरात 155 पोलिसांना लागण Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्र पोलिसांवर कोरोनाचे संकट; आठवड्याभरात 155 पोलिसांना लागण

राज्यामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस परत एकदा वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यामध्ये कोरोनाचा (Corona) धोका दिवसेंदिवस परत एकदा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे वाढत असलेले प्रमाण अगोदर असलेल्या लाटांच्या तुलनेमध्ये तिसऱ्या लाटेत (Third Wave) तीनपटीने वाढताना असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र पोलिसातील (Maharashtra Police) अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. आतादेखील तो धोका परत वाढताना दिसत आहे.

राज्यामध्ये (state) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाची सर्वाधिक लागण झाली आहे. तर हिंगोलीमध्ये (Hingoli) सर्वात कमी पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत ४६ हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५०० पोलिसांचा (Police) कोरोनाने बळी (Corona Death) घेतला आहे. राज्यामध्ये सध्या ८ हजार ८३६ पोलीस क्वारंटाईन आहेत.

हे देखील पहा-

कोरोनाची तिसरी लाट सर्वानाच आपल्या विळख्यात घेत आहे. यामधून आपल्या कार्यावर सदैव तत्पर असणारे पोलीस देखील बचावले नाही. राज्यात पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. राज्यामध्ये इतर पोलीस दलाच्या तुलनेत मुंबईतील मुंबई पोलीस सर्वात जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यामध्ये मुंबई पोलीस सर्वात मोठे पोलीस दल आहे.

राज्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या मुंबईमध्ये आहे. यामुळे राज्यात सर्वात जास्त कोरोनाची लागण इतर पोलीस दलाच्या तुलनेत मुंबई पोलिसांना सर्वाधिक झाली आहे, असा विचार तुम्ही करत असाल. पण हे चुकीचे आहे. कारण बेजबाबदार मुंबईकर याला जबाबदार आहेत. नेहमी सांगून देखील मुंबईकर कोरोना नियमांचे पालन करत नाही. ज्याचा परिणाम मुंबई पोलिसांना भोगावा लागत आहे.

प्रत्येक वेळेस कायदा- सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस पुढे असतात. पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा या तिसऱ्या लाटेमध्ये पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिसऱ्या लाटेमध्ये अवघ्या आठवड्याभरात तब्बल १५५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ४५ पोलीस असे आहेत. ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना कोरोना होवून गेला आणि ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. अशा एकाही पोलिसांला कोरोनाची लागन झाली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT