Cordelia Cruise Saam Tv
मुंबई/पुणे

Cordelia Cruise Corona Update: कॉर्डेलियावरील 1,827 प्रवाशांची कोरोना चाचणी

जहाजावरील एकूण 1 हजार 827 प्रवाशांची कोव्हिड तपासणी करुन, त्यांच्या स्वॅबचे नमुने 2 वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

Cordelia Cruise Corona Update: मुंबई : मुंबईत ग्रीन गेट येथे कॉर्डेलिया क्रूझ काल मंगळवारी (4 जानेवारी) आल्यानंतर त्यावरील 60 बाधित रुग्णांना भायखळा येथील रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोव्हिड केंद्र आणि इतर विविध हॉटेल्समध्ये दाखल केले आहे. जहाजावरील एकूण 1 हजार 827 प्रवाशांची कोव्हिड तपासणी करुन, त्यांच्या स्वॅबचे नमुने 2 वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले आहेत (Cordelia Cruise Corona Update 1827 Passengers Corona test taken).

या सर्व प्रवाशांचे चाचणी अहवाल आज बुधवारी (5 जानेवारी) दुपारपर्यंत अपेक्षित आहेत. बाधित रुग्णांच्या वाहतुकीसाठी 17 आसनी क्षमतेच्या 5 रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत.

ज्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशा सर्व रुग्णांना 7 दिवस गृह विलगीकरण सक्तीचे केले आहे. तर कोरोना (Corona) पॉझिटीव्ह व्यक्ती पुन्हा रिचर्डसन आणि क्रुडास किंवा सशुल्क हॉटेल्समध्ये असतील. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT