Guillain Barre Syndrome Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune GBS : दूषित पाणीच जीबीएस फोफावण्याचे प्रमुख कारण, एनआयव्हीच्या अहवालातून स्पष्ट

Pune GBS News Update : पुण्यात जीबीएस आजारा फोफवत आहे, दररोज रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रीय विषाणू संस्थेनं पुण्यात सर्व्हेक्षण करत कारण शोधलेय.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे

Pune GBS News : दूषित पाणी हाच गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) हा आजार होण्याचे प्रमुख कारण आहे, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून समोर आली आहे. पुण्यात जीबीएसचे रुग्ण पूर्वी आढळत होते, मात्र आता मोठ्या संख्येने रुग्ण आढळण्याची कारणेही एनआयव्हीकडून शोधली जाणार आहेत.

एनआयव्हीने पुणे महापालिकेस केलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याबरोबरच संबंधित गावांसाठी छोटा जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा महापालिकेने विचार सुरू केला आहे. जीबीएस आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन, एनआयव्ही व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी महापालिकेत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एनआयव्हीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी अहवालाबाबतची माहिती दिली.

पुण्यात जीबीएस चे ४ नवे रूग्ण

पुणे शहरासह जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या १७० वर पोहोचली आहे. त्यातील ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ६१ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी,खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपयायोजना केल्या जात आहेत.

पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रूग्णांपैकी १३२ रूग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. बाधितांमध्ये ३३ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून,सर्वाधिक रुग्णसंख्या (८६) ही समाविष्ट गावातील आहे. २२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २१ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत.

पुण्यात जीबीएसची स्थिती

वय – एकूण रुग्णसंख्या

० ते ९ – २२

१० ते १९ – २३

२० ते २९ – ३८

३० ते ३९ – २१

४० ते ४९ – २२

५० ते ५९ – २५

६० ते ६९- १४

७० ते ७९ – २

८० ते ८९ – ३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT