Pune NEws Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुणे-बेंगळूरू महामार्गावर विचित्र अपघात; भलामोठा कंटेनर पुलावरुन थेट खाली रस्त्यावर कोसळला

अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : पुणे-बेंगळुरु महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघतात कंटेनर थेट बावधनच्या पुलावरून खाली रस्त्यावर कोसळला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रकचालक जखमी झाली आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु महामार्गावरुन हा कंटेनर जात होता. अचानक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकला जाऊन धडकला. धडक एवढी जोरदार होती की कंटेनर दुभाजक मोडून थेट पुलाखाली कोसळला. (Accident News)

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कंटेनर चालक जखमी झाला आहे. अपघात घडला त्यावेळी पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. कंटेनर कुठे जात होता? अपघात कसा झाला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT