Kasba Vidhan Sabha by-election  saam tv
मुंबई/पुणे

Kasba Bypoll Electio News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज भरणार - नाना पटोले

Kasba Bypoll Electio News : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावाला आता काहीही अर्थ नाही असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

Chandrakant Jagtap

Kasba Bypoll Electio News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या काँग्रेस अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे, त्यांनी टिळकांना डावललंय, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नाही असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा मला फोन आला होता, कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे आणि त्यांनी टिळकांना डावलले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला आता काही अर्थ नाही असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्री एक बोलतात आणि फडणवीस त्याच्या विरोधात वागतात असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. (Latest Marathi News)

काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही, परंतु उद्या उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. नाना पटोले यांना राज ठाकरे यांनी निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी लिहिलेल्या पत्राविषयी प्रश्न विचारल्यानंतर 'टिळकांच्या घरातला उमेदवार दिला गेला नाहीये, त्यामुळे कोणाची वकिली चालण्याचं कारण नाही', अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

अदानीविरोधात आंदोलन करणार

नाना पटोले यांनी उद्योगपती अदानीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याची देखील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उद्या काँग्रेस महाविकासआघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी भरल्यानंतर अदानी विरोधात काँग्रेस आंदोलन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

'70 पैकी 35 टक्केच जंगल शिल्लक' कर्जतमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे संतापले|VIDEO

Sweet Bor Recipe : दिवाळीचा फराळ होईल खास! बनवा कोकण स्पेशल खुसखुशीत गोड बोरं, खूपच सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

SCROLL FOR NEXT