nana patole  saam tv
मुंबई/पुणे

विधापरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असावा; नाना पटोले यांची मागणी

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा , अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

सूरज सावंत

मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीमुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अजित पवारांना विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळालं. तर विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा , अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. (Nana Patole News In Marathi )

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. नाना पटोले म्हणाले, 'राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या आमदारांना बोलावलं आहे. त्या संदर्भात आम्ही बैठक घेत आहोत. विधानपरिषद व विधीमंडळात आमदार विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित होते, याची दखल दिल्लीतील काँग्रेस (Congress) नेत्यांनी घेतली आहे. त्यानुसार दिल्लीतील वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील'. दरम्यान, विधानपरिषदेत आमचा विरोधी नेता व्हावा, प्रमुख मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

'प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर मला काही भाष्य करायचं नाही. देशात मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना दोषी शत्रू ठरवलं जात आहे. यावर राजस्थानच्या मुख्य न्यायमूर्तींचे मत महत्वाचं आहे. न्यायव्यवस्था ही महत्वपूर्ण व्यवस्था असून त्याचे मत लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाचे आहे. महाराष्ट्रात एका पक्षाला एक तर दुसऱ्या पक्षाला वेगळं न्याय मिळतो ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यपाल दुटप्पीपणा करत आहेत.

'नव्या सरकारने मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणं म्हणजे सूड बुद्धीने हे होत आहे. वेळ पडल्यास महाविकास आघाडी बैठक घेऊन उद्धव ठाकरे आणि पवार यांच्याशी चर्चा करून राज्यपाल यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊ, वेळ पडल्यास न्यायालयातही जाऊ. कारण अशा प्रकारे निर्णय मागे घेऊन जनतेचं नुकसान होत आहे', असे नाना पटोले म्हणाले. दीपाली सय्यदवर भाष्य करताना पटोले म्हणाले, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT