चु**या म्हणजे... राऊतांनी वापरलेल्या 'त्या' शब्दाचा नेमका अर्थ कॉंग्रेसने सांगितला... Saam Tv
मुंबई/पुणे

चु**या म्हणजे... राऊतांनी वापरलेल्या 'त्या' शब्दाचा नेमका अर्थ कॉंग्रेसने सांगितला...

संजय राऊतांच्या बचावासाठी आता कॉंग्रेस पक्ष पुढे आला आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी राऊतांनी वापरलेला त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशातून सांगितला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना वापरलेल्या एका शब्दामुळे राजकारण चांगलंच तापलंय. एकीकडे भाजपच्या (BJP) महिला आघाडीने राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार (Case) दाखल केली आहे, तर राज्यातही भाजपने त्यांना धारेवर धरलं आहे. अशातच संजय राऊतांच्या बचावासाठी आता कॉंग्रेस पक्ष पुढे आला आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant, Congress) यांनी राऊतांना समर्थन देत राऊतांनी वापरलेला त्या शब्दाचा अर्थ म्हणजे मुर्ख होतो असं ट्विट सचिन सावंतांनी केलं आहे. यासाठी त्यांना शब्हकोशाच्या एका पानाचा फोटो देखील शेयर केला आहे. (Chu ** ya means ... Congress gave the exact meaning of the word 'that' used by Sanjay Raut)

हे देखील पहा -

सचिन सावंतांच समर्थन

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या समर्थनार्थ कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी चु**या या शब्दाचा नेमका अर्थ सांगितला आहे. यावेळी त्यांनी एका शब्दकोशाचा आधार घेत भाजपवरच निशाणा साधला आहे. सचिन सावंत आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, "आश्चर्य आहे! संजय राऊत यांच्यावर भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै. श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे." असं म्हणत सावंतांनी या शब्दकोशातील पान नं. ६८ आणि ६९ चे फोटोज् शेयर आहेत, ज्यात पान नं. ६८ वर चु**या या शब्दाचा नेमका अर्थ सांगण्यात आला आहे.

नेमका काय वाद होता?

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बसण्यासाठी स्वतः खुर्ची देताना दिसतायत. दरम्यान, यावेळी संजय राऊत हे शरद पवारांसाठी खुर्ची आणत आहेत असा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवरुन विरोधी पक्ष संजय राऊतांना ट्रोल करत आहे. यावर संजय राऊत यांनी त्यांना सणसणीत उत्तर दिलं. मात्र यावेळी उत्तर देताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह शब्दाचा (Offensive Statement) उल्लेख केला होता. याच शब्दावरुन गदारोळ सुरु असुन भाजपने राऊतांना धारेवर धरलं असताना कॉंग्रेस राऊतांच्या बचावाला समाेर आली आहे.

राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊत यांना पवारांसाठी खुर्ची घेऊन जात असल्याच्या प्रसंगावरून व्हायरल फोटोवरुन भाजपा नेत्यांची टीका सुरु आहे यासंबंधी विचारण्यात आले. त्यावेळी राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत, त्यांनींच मला हे संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण आमचे आदर्श आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही सांगा त्यांना…ही चु**** बंद करा. अशाने राज्यात तुमचं राज्य कधीच येणार नाही. ही तुमच्या डोक्यातील विकृती, कचरा आहे. हा कचरा साफ केला नाहीत तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाढून टाकतील” हे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीयांच्या भेटींवरुन भाजपा नेते करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं. राऊत एवढ्या घाईघाईने भेटी घेत आहेत असं विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “मी बोललो ना हे सगळे चु** आहेत. चु**... ते वेडे आहेत…त्यांची प्रकृती बिघडली आहे, मानसिक आजार झाला आहे सर्वांना. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करून घ्या असं सांगेन”. असं राऊत यावेळी म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT