Vinod Kambli Saam Tv
मुंबई/पुणे

Vinod Kambli : विनोद कांबळी पुन्हा वादात; पत्नीचे गंभीर आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल

विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

सूरज सावंत

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याच्या पत्नीने मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर अत्याचार आणि मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

विनोद कांबळीच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरुद्ध भादंवि कलम ३२४ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कांबळी यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल तिच्यावर फेकले, त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी वांद्र पोलिस अधिक तपास करत आहेत.

विनोद कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्र्यातील फ्लॅटवर पोहोचला आणि त्याने पत्नीला शिवीगाळ केली. त्यानंतर तो स्वयंपाकघरात पळत गेला आणि स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल घेऊन तिच्यावर फेकले. वांद्रे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस येण्यापूर्वी विनोद कांबळी यांच्या पत्नीने भाभा रुग्णालयात उपचार घेतले.

वाद आणि विनोद कांबळी

विनोद कांबळीचा वादांशी जुना संबंध आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, माझ्याकडे कोणतेही काम नाही आणि मी फक्त बीसीसीआयच्या पेन्शनवर जगत आहेत. काही दिवसांपूर्वी तो दारू पिऊन गाडी चालवल्यामुळेही चर्चेत आला होता.

विनोद कांबळीचं करिअर

विनोद कांबळीने भारताकडून 17 कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याच्या नावावर 1084 धावा आहेत. 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी 2477 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीत त्याने 129 सामन्यांमध्ये 9965 धावा केल्या आहेत. विनोद कांबळी 2000 साली भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT