Pune Accident CCTV Footage Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident CCTV Footage : कारच्या धडकेत बाईकसह दोघे उंच उडाले, एकाचा मृत्यू; पुण्यातील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : पुणे-नाशिक महामार्गावर संतवाडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील जुन्नर येथे कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. पुणे-नाशिक महामार्गावर संतवाडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा थरकाप उडवणार व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, दुचाकीस्वाराला रस्ता ओलांडायचा होता. दुचाकीस्वाराने गाडी स्लो करुन रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक समोरुन आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. (Accident News)

अपघाताचा व्हिडीओ

कारची धडक इतकी भीषण आणि जोरदार होती की धडकेनंतर दुचाकीसह दोघेजण फुटबॉलप्रमाणे वर उडाले. धडकेनंतर कार न थांबता पुढे निघून गेली. मात्र धडकेनंतर खूप मोठा आवाज झाला. आवाज ऐकून आजूबाजून लोक रस्त्यावर जमा झाले. (Live Marathi News)

जमावाने दुचाकीवरील दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र घटनेत सुरेश जेडगुले यांचा मृत्यू झाला आहे. तर अनिल निमसे गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT