Ambarnath Railway Satation Saam TV
मुंबई/पुणे

अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून कॉलेज तरुणी जखमी, ॲम्बुलन्स वेळेत न आल्यामुळे तरुणी ४० मिनिटं प्लॅटफॉर्मवरच

दिव्या संजय जाधव असं या १७ वर्षीय कॉलेज तरुणीचं नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अजय दुधाणे

कल्याण : अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून एक १७ वर्षीय कॉलेज तरुणी जखमी झाली. मात्र त्यानंतर ॲम्बुलन्स वेळेत न आल्यामुळे ही तरुणी जखमी अवस्थेत तब्बल ४० मिनिटं प्लॅटफॉर्मवरच पडून होती.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी संध्याकाळी एक तरुणी लोकलमधून पडली. दिव्या संजय जाधव असं या १७ वर्षीय कॉलेज तरुणीचं नाव असून ती कॉलेजहुन घरी परतत असताना हा अपघात घडला. (Latest Marathi News)

यानंतर रेल्वे पोलिसांनी तिला उचलून अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणलं. मात्र तिथे आल्यानंतर तिला रुग्णालयात पाठवण्यासाठी ॲम्बुलन्सच वेळेत आली नाही. त्यामुळे जखमी अवस्थेत ही तरुणी तब्बल ४० मिनिटं अंबरनाथ रेल्वे स्थानकात पडून होती.

अखेर ॲम्बुलन्स आल्यानंतर तिला आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. या घटनेमुळे रेल्वे अपघातातील जखमींना योग्य वेळेत मदत मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

Hair Care: टोमॅटोच्या रसाने केस पुन्हा उगवू शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Maharashtra News Live Update: चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णणावर नागरिक संतप्त, शिंदेसेनेचा आंदोलनाचा इशारा

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT