बेस्टकडे जमा झालाय नाण्यांचा खच... Saam Tv
मुंबई/पुणे

बेस्टकडे जमा झालाय नाण्यांचा खच...

बेस्ट देणार उच्च मूल्य नोटांच्या बदल्यात सुटी नाणी

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बेस्टने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तिकिटांचे दर कमी केले होते, सामान्य बस मधून ५ रुपये तर वातानुकूलित बस मधून प्रवासासाठी ६ रुपये प्रवासी भाडे दर आकारला जात आहे. त्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे . परिणामी उत्पन्न देखील वाढले आहे . पण हे उत्पन्न ५ आणि ६ रुपयाने असल्यामुळे बेस्टकडे येणाऱ्या नाण्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणत वाढली आहे. चलनी नोटा जमा होऊ लागण्या ऐवजी नाणी जमा होऊ लागली आहेत.

हे देखील पहा -

सध्या बेस्टकडे इतकी चलनी नाणी झाली आहे की बेस्ट ने थेट व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना उच्च मूल्य चलनी नोटांच्या बदल्यात सुटी नाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या मुंबईतल्या सगळ्या आगारात रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता इतर कामाच्या दिवशी सकाळी ०९:३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुट्या नोटा आणि नाणी उच्च मूल्य नोटांच्या बदल्यात वितरित करन दिली जाणार आहेत .

बेस्ट कडे तिकिटांचे नाण्याच्या स्वरूपात येणारे पैसे अधिक जमा होत असल्याने, बेस्ट प्रशासनाने बँकेसोबत करार केला होता . सध्या हा करार सपंला असून बँकेसोबत नव्याने करार अद्याप झाला नाही आहे . नव्याने करार होई पर्यंत ही नाणी अधिक प्रमाणात जमा होऊ लागली आहेत . त्यामुळे बेस्टच्या कर्मचार्यांना देखील वेतनाची काही रक्कम म्हणून ही नाणी वा कमी मूल्याच्या नोटा दिल्या जातात . पण आता हा सुट्या नाण्यांचा साठा वाढल्यामुळे ही नाणी आता सर्वसामान्य वा व्यापाऱ्यांना उच्च मूल्याच्या नोटांच्या बदल्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT