eknath shinde saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : धनुष्यबाण चिन्हाबाबत CM शिंदेंचा मोठा दावा, म्हणाले आमच्याकडे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय.

Satish Daud

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय. मेरीटनुसार धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळणार असा दावा शिंदेंनी केला आहे. याशिवाय ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) शिंदेंनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असा उल्लेखही केला. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

'55 पैकी 40 आमदार हे आमच्यासोबत आहेत. त्यांच्या मतांची आकडेवारी 39 लाख होते. तसेच 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत आहे त्यांच्या मतांची आकडेवारी 69 लाख, म्हणजे 70 टक्क्यांपेक्षा जास्त संख्याबळ आमच्याकडे त्यामुळे मेरीटनुसार, धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे आणि तो मिळेलच', असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की आमची बाळासाहेबांची शिवसेना तर आलेलीच आहे. बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. समोर कुठली कंपनी आलेली आहे माहित नाही. पण धनुष्यबाण हा नियमानुसार आम्हालाच मिळेल. (Latest Marathi News)

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. घटना आहे नियम आहे कायदा आहे कायद्याबाहेर आम्हाला काहीच नको, आम्ही कायद्याच्याबाहेर कुठलंही काम केलं नाही. म्हणून तर कोर्टाने देखील कायद्याप्रमाणे निर्णय दिला आहे', असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन चिन्ह देण्यात आलंय. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने 'धगधगती मशाल' तर शिंदे गटाने ढाल तलवार हाती घेतलीये. याशिवाय शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलंय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT