Eknath Shinde News saam tv
मुंबई/पुणे

Srinivasa Kalyanam Festival : सर्वांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे दिवस येत राहोत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath shinde in dombivli : श्री श्रीनिवास महोत्सवाच्यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली.

साम टिव्ही

अभिजीत देशमुख, कल्याण

Eknath Shinde Latest news :

श्री श्रीनिवास महोत्सवाच्यानिमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुखाचे आणि आनंदाचे दिवस येत राहोत, अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली. आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपती देवस्थान, श्रीनिवास महोत्सवाला हजेरी लावली. डोंबिवलीतील प्रीमिअर मैदानात हा महोत्सव पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन,पवित्र, मंगलमय झालाय. तिरुपती बालाजी हे तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी-समाधान-आनंद आणतात. ते माणसाचे आयुष्य बदलून टाकतात. त्याला दुःखातून सुखात आणतात. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावो'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबईत तिरुपती बालाजी मंदिराचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. त्या मंदिराचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच नवी मुंबईतच तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. आज या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन झाले. त्यांना येथील पूजेत सहभागी होता आले, प्रसादाचा लाभ घेता आला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी अयोध्या येथे राम मंदिर निर्माण झालं. त्यांच्या हस्ते अबूधाबीतही मंदिराचे लोकार्पण झालं. देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की, श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजीचे दर्शन झाले.तसेच प्रसादाचाही लाभ घेता आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष धन्यवाद. तिरुपती बालाजी त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे. त्यामुळे हा महोत्सव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो, या सदिच्छा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT