CM Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Investment: डाव्होसमध्ये राज्याला पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक, सुमारे १०,००० रोजगार उपलब्ध होणार

महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

डाव्होस : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये(Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

उदय सामंत म्हणाले की, आज डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'(World Economic Forum) च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी सांगितली. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

सामंजस्य काराराबद्दल सविस्तर माहिती

>> Greenko energy Projects Pvt.Ltd १२००० कोटींची गुंतवणूक

>> Berkshire Hathaway Home Services Orenda India १६००० कोटींची गुंतवणूक

>> ICP Investments/ Indus Capital १६००० कोटींची गुंतवणूक

>> Rukhi foods ४८० कोटींची गुंतवणूक

>> Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. १६५० कोटींची गुंतवणूक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

SCROLL FOR NEXT