CM Devendra Fadnavis News  Saam tv
मुंबई/पुणे

CM Devendra Fadnavis : जिकडे चूक आहे, तिकडे चूक म्हणावं लागेल, पण...; पुणे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

Devendra Fadnavis News : पुणे गर्भवती महिला प्रकरणात CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले, वाचा

Vishal Gangurde

पुण्यात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोपांची मलिका फैरी झडू लागल्या आहेत. गरोदर महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गरोदर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. राज्य शासनाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. 'जिकडे चूक आहे, तिकडे चूक म्हणावी लागेल.मात्र, रुग्णालय सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' भिसे कटुंबीयांनी माझी भेट घेतली आहे. मी त्यांना आश्वस्त केललं आहे की, फक्त या प्रकरणासाठी कारवाई करायची नाही. तर भविष्यात पुन्हा ही बाब होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, या दृष्टीने कारवाई करत आहोत. कमिटी सर्व प्रकारच्या गोष्टीत लक्ष घालणार आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात अशा घटना घडू नये, या दृष्टिकोनातून आमचा विचार आहे. त्यावर आम्ही काम करू'.

'मुळात आता आपण कायद्यात बदल करून काही अधिकार धर्मदाय आयुक्तांना दिले आहे. संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ऑनलाईनवर यावी. जेणेकरून कुठे बेड्स आहेत. किती उपलब्ध आहेत. बेड्स कुठे दिले जात नाहीत, याचं मॉनिटरिंग केलं जावं, त्यात मुख्यमंत्री आरोग्य कक्ष जोडण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून त्यांचावर दबाव राहिला पाहिजे. त्यात सुधारणा करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

रुग्णालय प्रशासनाच्या पत्रावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या कष्टाने उभं केलं आहे. खूप नावाजलेलं रुग्णालय आहे. अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. कालचा प्रकार असंवेदनशील होता. जिकडे चूक आहे. तिकडे चूक म्हणावं लागेल. पण ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मला आनंद आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT