Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime : आधी सिनेस्टाईल पाठलाग, नंतर भररस्त्यात चॉपरने हल्ला; कल्याणमधील थरारक घटना CCTV त कैद

Kalyan News: कल्याणमध्ये भरदिवसा एका तरुणावर चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

Satish Kengar

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याणमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणावर भररस्त्यात चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेच्या वसंत व्हॅली रोडवर घडल्याचं समजतं आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

चॉपर हातात घेऊन एका तरुणाचा पाठलाग करण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्ल्यात सत्कार भोईर हा तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यातील आरोप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यापूर्वी गांधारी परिसरात एका भरधाव जीपने दोन मुलांना उडवलं होतं. या अपघातानंतर जीपचालक तिथून फरार पसार झाला होता. त्या दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सत्कार भोईर यांनी पुढाकार घेतला होता.

हा अपघात नेमका कसा झाला, या मुलांना कोणत्या वाहनाने धडक दिली, अशी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला होता. याचीच माहिती सत्कार याने पोलिसांना दिली होती. याच रागातून त्याच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

सत्कार भोईर हा भिवंडीनजीकच्या देवरुंग गावात राहतो. ताे काल दुपारी खडकपाडा परिसरात सत्कार चायनीज खाण्यासाठी आला होता. सत्कारचा आर्यन पाटील नावाच्या तरुणाने पाठलाग केला. त्याच्यावर चॉपरने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात सत्कार हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसानी आर्यन पाटील आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT