Navi Mumbai CIDCO Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery: सिडकोच्या घरांना नापसंती, दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज; फक्त १५ हजार अर्जदारांनी भरली अनामत रक्कम

CIDCO housing scheme: दसऱ्याला सिडकोच्या २६ हजार घरांची लॉटरी जाहीर होताच हजारो नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले. आतापर्यंत १ लाख ६० हजार नागरिकांनी सिडकोचे घर घेण्यासाठी अर्ज केले आहेत.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

सिडकोने गतवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर माझे पसंतीचे घर म्हणत तब्बल २६ हजार घरांची सोडत काढली होती. मात्र सिडकोच्या माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांची नापसंती मिळत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सिडकोची घरे म्हणजेच नवी मुंबईमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नातील घरं अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध होतील असा नागरिकांचा समज असतो. मात्र यंदा सिडकोने प्रत्येक नोडमधील रेडी रेकनरनुसार घरांच्या किंमती जाहीर केल्याने सिडकोच्या घरांच्या किंमती थेट खासगी विकासाकांच्या घरांच्या किंमती एवढ्या झाल्यात.

दसऱ्याला सिडकोच्या २६ हजार घरांची लॉटरी जाहीर होताच हजारो नागरिकांनी आपले अर्ज दाखल केले. आतापर्यंत १ लाख ६० हजार नागरिकांनी सिडकोचे घर घेण्यासाठी अर्ज भरले होते. मात्र सिडकोने आपल्या घरांच्या किंमती जाहीर करताच यातील केवळ १५ हजार नागरिकांनीच आतापर्यंत अनामत रक्कम भरत घर घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

२५ लाखांपासून ते ९७ लाखांपर्यंत सिडकोची घरे असून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घरांच्या किंमती पाहून अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला ही घरे घेणे शक्य आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळेच मोठया प्रमाणात जाहिरातबाजी करूनही माझ्या पसंतीच्या घराला नागरिकांनी मात्र नापसंतीच दर्शवलेली पहायला मिळत आहे.

अनामत रक्कम भरण्यासाठी आणखी ३ दिवस असून या ३ दिवसांत किती नागरिक अनामत रक्कम भरतात याकडे सिडकोचे लक्ष लागले आहे. घरांच्या अवाढव्य किंमतीमुळे सिडकोच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळाला असून आता तरी सिडको आपल्या घरांच्या किंमती कमी करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

साखरपुड्यानंतर घराकडे येताना काळाचा घाला, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मृतदेह काढण्यासाठी बोलवावा लागला JCB

Refrigerator Placement: किचनमध्ये फ्रीज ठेवण्याची योग्य दिशा कोणती? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT