'मुंबईचा दादा आम्हीच' म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकरच उतरवतील; चित्रा वाघ यांचे राऊतांवर टीकास्त्र Saam TV
मुंबई/पुणे

'मुंबईचा दादा आम्हीच' म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकरच उतरवतील; चित्रा वाघ यांचे राऊतांवर टीकास्त्र

'सर्वज्ञानी संजयजी मुंबईचा ७/१२ नावावर केलात की काय ? मुंबईकरांचं अजून किती मनोरंजन करणार आहात..?'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज भाजप विरोधात अनेक आरोप केले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर (ED) करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात असून आम्हाला बदनाम करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. मात्र त्यांच्या या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही, याद राखा, मुंबईत शिवसेनाच (Shivsena) दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशाराच संजय राऊतांनी दिला होता आणि त्यांच्या या वक्तव्यावरुनच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत राऊतांना टोला लगावला आहे.

त्या ट्विट मध्ये म्हणाल्या आहेत, 'सर्वज्ञानी संजयजी मुंबईचा ७/१२ नावावर केलात की काय ? मुंबईकरांचं अजून किती मनोरंजन करणार आहात..? असा प्रश्न वितारतच, मुंबईचा दादा असल्याचं तुम्हाला बोलून दाखवावं लागतयं यातचं सगळं आलं असा टोलाही त्यांना लगावला. तसचं त्या पुढे म्हणाल्या, मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी आणि माज आत मुंबईकरच उतरवेल.'

दरम्यान संजय राऊतांचे धमक्या देण्याचे दिवस आता संपले असून त्यांची जागा आता 'आतमध्ये' असल्याचे ट्विट नारायण राणेंनी (Narayan Rane) आज केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या समाधी मंदिरात चांदीचा नवा नंदी विराजमान..

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT