Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: 'राजकीय हस्तक्षेपामुळेच कोयता गॅंगची दहशत...' अजित पवारांचा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल

अजित पवारांनी उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज दिवंगत लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव आणि सांगवी परिसरात जाहीर सभा घेतली..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chinchwad: पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवत आहे. तर, दुसरीकडे शिवसेना-शिंदे गट आणि भाजप युतीचे उमेदवार आहेत. प्रचारात दोन्ही बाजूचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीत महा विकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचं प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Pune by Election)

काय म्हणाले अजित पवार...

आपल्या भाषणात अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. ज्यामध्ये ते म्हणाले की, "मी प्रत्येकवेळी गाववाल्यांना पण संधी देली आणि गावा बाहेर वाल्याना पण संधी दिली. लक्ष्मण जगताप हा माझा कार्यकर्ता होता. मी त्याला घडवला," असे अजित पवार म्हणाले.

त्याचबरोबर यावेळी अजित पवार यांनी "मेट्रो पुण्यात आणण्याच काम कुणी केले, प्रस्ताव कुणी मंजूर केला मात्र आता काही लोकं म्हणतात आम्ही दिल्लीला गेलो होतो,आणि तिथे मेट्रो पाहिलं आणि मेट्रो पुण्यात आणली," असे म्हणत लोकांची दिशाभूल करु नका असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून सरकारचा हस्तक्षेप वाढल्याने पोलिस काम करत नाहीत, त्यामुळेच कोयता गॅंग तयार झाली असा हल्लाबोलही शिंदे- फडणवीस सरकारवर केला. (Ajit Pawar)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT