मुंबई/पुणे

CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचे चॅलेंज स्वीकारले? वरळीच्या स्वच्छता मोहिमेतून दिले संकेत? चर्चांना उधाण

CM Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी वरळीत स्वच्छता मोहीम राबवल्याने मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Bharat Jadhav

(सचिन गाड)

CM Eknath Shinde Accepted Aditya Thackeray Challenge:

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिलं होतं. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत रविवारी वरळी भागात स्वच्छता मोहीम राबवली. यामुळे वरळीत स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे चॅलेंज स्वीकारल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.(Latest News)

गेल्या आठवड्यात आपण मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरोधात नाही तर थेट मुख्यमंत्र्यांविरोधात ठाण्यातून निवडणूक लढवण्यास तयार आहे असल्याचं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानानंतर अवघ्या काही दिवसातच मुख्यमंत्री (Chief Minister) स्वतःवरळीत साफसफाई करताना दिसले. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात साफसफाई करत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न करण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की, आपण संपूर्ण मुंबई साफ करत असून अडीच वर्षाची घाण साफ करत आहोत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अशाप्रकारे स्वच्छता मोहीम राबवणे, उद्घाटन आणि रोड शो करण्यावरून मुख्यमंत्र्यांनी आदित्यचं चॅलेंज स्वीकारलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT