Chhatrapati Sambhajinagar Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Sambhajinagar Accident News: जेवण करून परतताना बोलेरोने उडवलं; दोन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Accident News: भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident News) दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात जालना रोडवरील सुंदरवाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला.

घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. विजय जगन्नाथ काकडे, अभिषेक राजू लोकल असे मयत झालेल्या दोन मित्रांची नावं आहे. तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तिकर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अभिषेक हा कंपनीत काम करून आला. त्यानंतर विजय, अभिषेक, उमेश हे तिघे दुचाकीवरुन जालना रोडवर सुंदरवाडी (Chhatrapati Sambhajinagar) येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले. दरम्यान, जेवणानंतर तिघेही घराकडे निघाले.

तेथून दुचाकीवरून विरुद्ध दिशेने जात असताना झाल्टा फाट्यावर अज्ञात बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असतात दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर एकावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बुलढाण्यात बोलेरो-अल्टो कारचा अपघात

बुलढाण्यावरून खामगावकडे जाणाऱ्या अल्टो कारला समोरून एका वाहण्याला ओव्हरटेक करत असताना बोलेरो जीपने जोरदार धडक दिली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना खामगाव रोडवरील बोथा घाटातील नांद्री गावाजवळ घडली. अपघातानंतर कारच्या एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer warning signs: 99% लोकं चुकतात! ही लक्षणं दिसून आली तर समजा शरीरात कॅन्सरच्या गाठीची होतेय सुरुवात

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनाम

Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

Maharashtra Live News Update: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

Sutarfeni Recipe : हलवाई स्टाइल सुतार फेणी घरीच बनवा, राजस्थानी मिठाईचा आस्वाद घ्या

SCROLL FOR NEXT