रुपाली बडवे, मुंबई
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदाराकडून भुजबळांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगरमधील ओबीसी मेळाव्यात १६ नोव्हेंबरला राजीनामा दिल्याचं वक्तव्य केलं. मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री - दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याचेही समोर आलं आहे. (Latest Marathi News)
मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांना ओबीसी आरक्षण प्रश्नाबाबत मी घेतलेली भूमिका पटत नसल्यामुळे आपली अडचण होऊ नये, आपण मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरला सकाळी साडेबारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती हाती आली आहे. तर छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची 18 नोव्हेंबरला एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तिन्ही मंत्र्यांनी छगन भुजबळ यांना राजीनामा देऊ नये, अशी विनंती केली.
भुजबळांनी राजीनामा दिला तर हे मंत्रिमंडळासाठी योग्य ठरणार नाही. तसेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये असे त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं.
त्यानंतर छगन भुजबळ यांनी तिन्ही मंत्र्यांना राजीनाम्याबाबत माध्यमांमध्ये सांगणार नसल्याचे कबूल केलं. मात्र, त्यानंतरही छगन भुजबळांनी राजीनामा मागे घेतला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अजूनही छगन भुजबळ यांचा राजीनामा असल्याची माहिती हाती आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.