'आतापर्यंत जोशी भविष्य सांगयाचे, पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले.'  Saam TV
मुंबई/पुणे

'आतापर्यंत जोशी भविष्य सांगयाचे, पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले.'

'किरीट सोमय्यांच्या बाबतीत झालेली घटना हा एक अपघात असू शकतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले काही धंदे करत नाहीत.'

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : 'आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते, पाटील कधीपासून भविष्य सांगायला लागले.' असा टोला राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लगावला आहे. पत्रकारांशी बोलत असाताना त्यांनी महाविकास आघाडीवरती भाजप नेत्यांनी केलेल्या टीकांवरती उत्तर देत असताना पाटील यांना हा टोला लगावला.

दरम्यान किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) मुख्यमंत्र्य़ावरती केलेल्या आरोपाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'सोमय्या रोज काहीतरी बोलत असतात, मुख्यमंत्री असले काही धंदे करत नाहीत, सोमय्यांनी केलेल्या आरोपावरुन म्हणाले की, ' किरीट सोमय्यांच्या बाबतीत झालेली घटना हा एक अपघात असू शकतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले काही धंदे करत नाहीत.

तसंच महाविकास आघाडी सरकार पडणार असं चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या दाव्यावरती ते म्हणाले, 'आतापर्यंत जोशी भविष्य सांगत होते पाटील कधीपासून भविष्य (Future) सांगायला लागले, मला तर आश्चर्य वाटत आहे असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकार हे दहा मार्चला पडणार असल्याचं वक्तव्य केलं होत आणि त्यांच्या याच वक्तव्यावरती भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

New Labour Code: नवीन कामगार कायदा लागू; पगारापासून ते PF वर होणार परिणाम; वाचा सविस्तर

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Diabetes Symptoms: अचानक हे ५ बदल दिसले तर समजा शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय, वेळीच लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT