chembur 19-year-old college girl was physically abused by two persons mumbai crime Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; चेंबूरमधील संतापजनक घटना, आरोपी अटकेत

Satish Daud

Mumbai Chembur Crime News

शितपेयातून गुंगीचं औषध देऊन एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या चेंबूर परिसरात घडली आहे. पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) क्वार्टर्स येथील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजितकुमार यादव (वय २६ वर्ष), प्रभाकर यादव (वय ३० वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही कोर्टासमोर हजर केलं असता, कोर्टाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराची घटना १५ ते १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पीडित तरुणी मूळ पालघर जिल्ह्यातील रहिवासी असून ती चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसरात राहते. आरोपी देखील याच परिसरात रहिवासी आहे.

त्यामुळे पीडितेच्या आणि आरोपीच्या कुटुंबीयांमध्ये ओळख होती. पीडिता आणि आरोपी देखील एकमेकांना ओळखत होते. १५ नोव्हेंबरच्या रात्री पीडितेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे पीडित तरुणी घरात एकटीच होती.

दुसरीकडे आरोपीचे कुटुंबीय देखील घराबाहेर गेल्याने तो आणि त्याचा मित्र घरात पार्टी करीत बसले होते. दरम्यान, पीडित तरुणी घरात एकटी असल्याचं लक्षात येताच आरोपीने स्वयंपाकाची वस्तू हवी, असा बहाणा करत पीडितेचा दरवाजा ठोठावला.

ओळख असल्याने पीडितेने आरोपीला हवी असलेली किचनमधील वस्तू आणून दिली. यादरम्यान, आरोपीने गोड बोलून पीडितेला शीतपेय दिलं. शीतपेय प्राशन करताच तरुणी बेशुद्ध झाली. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी आणि त्याच्या मित्राने पीडित तरुणीवर बलात्कार केला.

दरम्यान, तरुणी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. याशिवाय तिला त्रासही जाणवत होता. तेव्हा शेजारील तरुणाने आपल्यावर बलात्कार केल्याचं तिच्या लक्षात आलं. या घटनेची माहिती पीडितेने आपल्या वडिलांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT