MPSC Exam News
MPSC Exam News Saam TV
मुंबई/पुणे

MPSC Exam: एमपीएससी अभ्यासक्रम आणि परीक्षेची बदलेली पद्धत २०२५ पासून लागू करावी; पुण्यात विद्यार्थ्यांची जोरदार निदर्शनं

Dnyaneshwar Choutmal

MPSC Latest News: एमपीएससीने अभ्यासक्रम आणि परिक्षा पद्धत बदलल्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत केलं खरं मात्र, हा निर्णय २०२३ नाही तर २०२५ पासून लागू करावा अशी भूमिका मांडली. विद्येच्या माहेरघरात आज याच मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. (Pune Latest News)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू केली जाणार आहे. याच्या विरोधात पुण्यात आज विद्यार्थ्यांनी आंदोलन  (Protest) केलं. याआधी मुख्य परीक्षा (MPSC) ही बहुपर्यायी पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने अभ्यास केला. आता आयोगाने नव्याने केलेला बदल चांगला असला तरी तो पुढील वर्षांपासून लागू होणार असल्याने इतकी वर्षे केलेल्या अभ्यासाचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सात महिन्यांत पूर्ण होणे शक्य नसल्याने या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे.

या अगोदर काय घडले?

- दळवी समितीने २ मे २०२२ला आपला अहवाल आयोगाला सादर केला.

- २४ जून २०२२ला अभ्यासक्रमात नवीन बदल करण्याचा निर्णय जाहीर झाला.

- २० जुलै २०२२ला इंग्रजी भाषेत तर १७ ऑक्टोबर २०२२ला मराठी भाषेतील अभ्यासक्रम सादर करण्यात आला.

- नवीन अभ्याक्रमनुसार पहिली परीक्षा ३ जून २०२३ला, तर मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर २०२३ ला होणार आहे.

विद्यार्थ्यांनी आंदोलने केली त्यांचं सरकारने ऐकलं नाही. विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांचही सरकार ऐकतं नसल्याने हे सरकार बेताल सरकार असल्याचा आरोप केला जातोय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakhi Sawant Hospitalized : कॅन्सरच्या चर्चादरम्यान राखी सावंतने स्वत:च हॉस्पिलमधून दिले हेल्थ अपडेट, कधी होणार सर्जरी?

Mrunal Thakur: मृणालच्या नखरेल अदा; पाहा खास फोटो

Bike Stunt Video : बाईक स्टंटच्या नादात भीषण अपघात; गर्लफ्रेंडसोबत तरुण धाडकन खाली आदळला, पाहा VIDEO

T20 World Cup 2024: जय शहांची मोठी भविष्यवाणी! म्हणाले, टीम इंडियासह हे ३ संघ गाठणार सेमीफायनल

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT