'साध्वी' सावित्रीबाई फुले नावं बदला, अन्यथा तीव्र आंदोलन करणार; समता सैनिक दलाचा इशारा! SaamTV
मुंबई/पुणे

'साध्वी' सावित्रीबाई फुले नावं बदला, अन्यथा तीव्र आंदोलन करणार; समता सैनिक दलाचा इशारा!

आठवडा भरात हे नावं बदलून या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असं नामकरण करावं

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

पुणे : पुणेरी पाट्या (Puneri Board) किंवा फलक कायमच चर्चेचा विषय ठरतो, कधी या पाट्या कमी शब्दात अधिकाधिक आशय सांगणाऱ्या असतात तर कधी शालजोडीतले फटके मारणाऱ्या असतात, याच पुणे शहरात सध्या एका वादग्रस्त (Controversial) पाटीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटताहेत, पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Corporation एका उद्यानाला नाव देताना पाटीवर 'साध्वी सावित्रीबाई फुले' Sadhvi Savitribai Phule असा उल्लेख केलाय, या पाटीवरील सावित्रीबाईंच्या नावाला अगोदर असलेल्या साध्वी या शब्दाला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. (Change the name otherwise there will be intense agitation)

हे देखील पहा -

आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण आणि हिंदुत्ववादी विशेषणे लावून धार्मिकीकरण करणे चुकीचे आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहे, पाटीवरील साध्वी हा शब्द खोडावा अशी मागणी नागरिक करताहेत दरम्यान साध्वी शब्दावर आक्षेप घेत समता सैनिक दलाने Samata Sainik Dal सध्या हा शब्द कागदाने झाकून टाकला आहे.

दरम्यान, आठवडा भरात हे नावं बदलून या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असं नामकरण करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT