Chandrashekhar Bawankule On Nagpur Election Result Saam TV
मुंबई/पुणे

Nagpur Election Result : तो भाजपचा उमेदवार नव्हताच; पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सूरज सावंत

Chandrashekhar Bawankule On Nagpur Election Result : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. दरम्यान, या पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Political News)

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा विजय झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

नागपूरची जागा आम्ही कधीच लढत नाही. ती शिक्षक परिषद लढते. भाजपने त्यांना फक्त पाठिंबा दिला होता. तो पराभूत उमेदवार भाजपचा नव्हता. यावर विरोधी पक्षाने हुरळून जाऊ नये, असा टोला चंद्रशेख बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते.

या निकालातून आत्म परीक्षण करावे असे काही नाही. नागपुरात निवडणुकीत भाजपचा उमेदवार असता, तर ही जागा आम्ही नक्कीच जिंकली असती. कोकणमध्ये आम्ही जिंकलो आहोत. अमरावतीमध्ये अजून ८० हजार मते मोजायची आहेत. आम्ही मतमोजणीची वाट बघू असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

 अजित पवार (Ajit Pawar)  डोळ्यात अंजन घातले पाहिजे. विक्रम काळे यांचा मागच्या वेळचा निकाल बघावा, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली आहे. नाना पटोले या निकालाने हुरळून गेले. या विजयातून कुणाचे नुकसान झाले नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT