OBC समाजाला महाविकास आघाडीने लॉलीपॉप दाखवले; चंद्रकांत पाटीलांचे टीकास्त्र Saam Tv
मुंबई/पुणे

OBC समाजाला महाविकास आघाडीने लॉलीपॉप दाखवले; चंद्रकांत पाटीलांचे टीकास्त्र

'OBC राजकीय आरक्षण राज्यसरकारने काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टाने फेटाळला हे अपेक्षित होते. आता हे म्हणायला मोकळे की बघा सुप्रीम कोर्टाने फेटाळला.'

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळावे म्हणून राज्य सरकारने अध्यादेश काढला होता मात्र त्या अध्यादेशाला आज सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे यावरुनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आणि याच प्रार्श्वभूमीवरती चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

हे देखील पहा -

यावेळी ते म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षण (OBC political reservation) राज्यसरकारने काढलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टाने फेटाळला हे अपेक्षित होते. आता हे म्हणायला मोकळे की बघा सुप्रीम कोर्टाने फेटाळला. मागास आयोगाची नावालाच नेमणूक झाली, या सरकारकडून काहीच प्रयत्न झालेले नाही. महाविकास आघाडी एकही केस जिंकलेली नाही. मोठी यादी आहे, यांना कोण सल्ला देतं हे शोधण्याची गरज आहे. यांना कलेक्शन करायचं फक्त, यात सामान्य माणसांचं नुकसान होतंय

गेल्या 2 वर्षात एकही केस हे सरकार जिंकलेले नाही. निवडणूका होऊ देणार नाही अशी भाजपची भूमिका आहे. आता छगन भुजबळ असं म्हणणार 2011 चा सर्व्हे मिळत नाही. पण तो विषय आणि इम्पीरिकल डेटा (Imperial data) हे दोन्ही विषय वेगळे आहेत असही पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. महाविकास आघाडीने पाठीमागून वार केले. कोर्टात न टिकणारा अध्यादेश काढला, ओबीसी समाजाला या महाविकास आघाडीने लॉलीपॉप दाखवले अशी टीका त्यांनी राज्य सरकारवरती केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT