Chandrakant Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील वाहतूक कोंडी मोडण्यासाठी चंद्रकांत पाटील मैदानात, मास्टार प्लान सांगितला

Pune Chandrakant Patil : पुण्यातील मिसिंग लिंकचा प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत. मिसिंग लिंकसाठी लागणारे पैसे राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका अर्धे अर्धे भरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Namdeo Kumbhar

Pune Traffic News : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीचा प्रमुख मुद्दा होता मिसिंग लिंक म्हणजे शहरातील अनेक जागा मालकांनी जागा न दिल्याने रस्त्यांची कामे झालेली नाहीत, त्याबाबतचा निर्णय घेणे. पुणे शहरात वाहतूक कोंडी होत आहे, याच एक कारण वाहने वाढली असं आहे. पब्लिक ट्रान्स्फरकडे नागरिक शिफ्ट होत नाहीत. मेट्रोचे सर्व मार्ग सुरू होण्यास आणखी खूप दिवस लागणार आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते जागा मालकांनी जाग न दिल्याने होत नाहीत, म्हणजे मिसिंग लिंक. जागामालक जागा देत नाहीत त्यामुळे मिसिंग लिंकला अडचणी होत आहेत, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

लवकर जागा ताब्यात घेण्यासाठी मदत करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुणे शहरात 33 मिसिंग लिंक आहेत, त्यात 15 कोथरूडमधील आहेत. त्या जागा ताब्यात घेण्यासाठी 850 कोटी लागणार पैसे लागणार आहेत, त्यापैकी अर्धे पैसे राज्य सरकार आणि अर्धे पैसे महानगरपालिका देईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

लवकरच पुण्यातील मिसिंग लिंकसाठीचा जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मिटेल. ज्या कोणाची जागा असेल त्यांना बोलून घेऊ. शहर वाढतच आहे. त्यामुळे शासनाकडे मागणी करून मागण्या मान्य करून घेऊयात. अतिक्रमण असेल किंवा ड्रग्स असेल यात नागरिकांनी दबाव आणणे गरजेचे आहे. पैसे नाहीत म्हणून पुणे महापालिकेचे कुठलेही काम आता थांबणार नाही, कात्रज कोंढवाबाबत लवकरच निर्णय घेऊन काम करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT