वाहतूक पोलिसांसमोर वाहनांवरील काळ्या काचांचे आव्हान... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

वाहतूक पोलिसांसमोर वाहनांवरील काळ्या काचांचे आव्हान...

कारवाई थंडावताच पुन्हा काळ्या काचांच्या वाहनांचा सुळसुळाट

प्रदीप भणगे

डोंबिवली -  वाहतूक शाखेकडून मोठा गाजावाजा करत काळ्या काचांवरील वाहन, फँसी नंबर प्लेट आणि बुलेट सायलेन्सवर कारवाईचा धडाका हाती घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांची कारवाई ही थंडावली असल्याने काळ्या काचांच्या वाहनांचा वावर हा डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांसमोर काळ्या काचांच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.        

वाहनांवरील काळ्या काचा काढून वाहतूक पोलीस कारवाई करत असल्याचा मोठा गाजावाजा केला होता. वाहनाच्या मालकासमोर वाहनांच्या काळ्या काचा काढल्या होत्या. नंतर कर्कश आवाजाच्या सायलेन्सरवर देखील कारवाई करण्यात आली होती. तसेच फँसी नंबर प्लेटवर देखील वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र या सर्व कारवाई थांबल्या होत्या. आता काळ्या काचांवरील वाहनांची वर्दळ ही रस्त्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. तसेच फँसी नंबर प्लेट लावलेल्या गाड्या पुन्हा दिसू लागल्या आहेत. 

हे देखील पहा -

बदलापूर - पाईपलाईन रोड, डोंबिवली, कल्याण शिळ रोड, कल्याण पूर्व , दिवा आणि कल्याण पश्चिम अश्या सर्वच ठिकाणी काळ्या काचांच्या वाहनांची वर्दळ ही सर्वाधिक वाढली आहे. त्यामुळे अश्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा घेणं अत्यंत गरजेचं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर आणि ठाणे आदी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आलेत असे असताना या शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवर काळ्या काचांच्या वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी हे वाहनामध्ये होते की नाही हे सुद्धा काळ्या काचांवरून ओळखता फिर्यादींना येत नाहीत.

त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर गुन्हेगारी देखील आता वाढत चालली आहे. घरफोड्या आणि चोऱ्यांचे प्रमाण हे झपाट्याने वाढत चालले आहे. त्यामुळे अश्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इन ऍक्शन मोड मध्ये येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरांमध्ये गुन्हेगार धुमाकूळ घालून ग्रामीण भागात आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अश्या गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इन ऍक्शन येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT