मास्क न लावणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने उगरला कारवाईचा बडगा Saam TV
मुंबई/पुणे

मास्क न लावणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने उगरला कारवाईचा बडगा

मास्क न घातलेले आढळले आणि त्यांच्याकडून रु. 2.6 लाख दंड वसूल करण्यात आले आहेत.

सुमीत सावंत

मुंबई : मास्क न घालणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. काल रोजी मास्क न घातल्याबद्दल मध्य रेल्वेने 190 जणांना दंड ठोठावला आहे. मध्य रेल्वेने प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोहीम तीव्र केली आहे. काल मध्य रेल्वेवरील (Central Railway) स्थानकांवर 190 व्यक्तींना मास्क न घातल्याबद्दल पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून 35,150/- रुपये दंड वसूल करण्यात आला. डिसेंबर 2021 मध्ये (दिनांक 26.12.2021 पर्यंत) एकूण 1,710 व्यक्ती मास्क न घातलेले आढळले आणि त्यांच्याकडून रु. 2.6 लाख दंड वसूल करण्यात आले आहेत.

17.4.2021 ते 30.11.2021 या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या विशेष पथकांनी कोविड-19 (Corona) मार्गदर्शक तत्त्वांनुसार मास्क न घातलेल्या प्रवाशांच्या एकूण 26,725 केसेस शोधून त्यांचेकडून 43.97 लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे.

- मुंबई विभाग - 2,628 जणांकडून रु. 5.13 लाख दंड वसूल

- भुसावळ विभाग – 12,808 जणांकडून रु. 15.02 लाख दंड वसूल

- नागपूर विभाग – 6,591 जणांकडून रु. 13.18 लाख दंड वसूल

- सोलापूर विभाग - 2,118 जणांकडून रु. 4.56 लाख दंड वसूल

- पुणे विभाग - 2,580 जणांकडून रु. 6.09 लाख दंड वसूल

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

Iron Deficiency : जास्त चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता होते का?

SCROLL FOR NEXT