Mumbai Local Train News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० उशिराने; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Priya More

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसच्या इजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. एक्स्प्रेस उंबरमाळी रेल्वे स्थानकावर थांबून असल्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गेल्या तासाभरापासून लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी प्रवाशांचे हाल होत आहे.

एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती उंबरमाळी रेल्वे स्थानकावरच थांबून आहे. कल्याणमधून दुसरे इंजन मागवले असून त्या इंजिनच्या सहाय्याने एक्स्प्रेस पुढे काढण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे याचा परिणाम लोकलसेवेवर देखील झाला आहे. त्याचसोबत लांबपल्ल्याच्या ट्रेनचे वेळापत्रक कोलमडलं.

याघटनेमुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीएसएमटी ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू असल्याचे अनाऊंसमेंट केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी; या पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा...

सावधान! बुलढाण्यात २४ तासांत ७ महिला बेपत्ता; अडीच महिन्यातील आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Skin Care : ग्लोइंग चेहरा हवाय? मग हा फेसपॅक नक्की लावा, त्वचा होईल चमकदार

Actress Threads: '१० मुलं घेऊन येईन…'; प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, भावाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT