CBI Raid On Sameer Wankhede  Saam Tv
मुंबई/पुणे

CBI Raid On Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे; आर्यन खान प्रकरण भोवलं?

समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे; आर्यन खान प्रकरण भोवलं?

Satish Kengar

CBI Raid On Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे यांच्या मुंबई येथील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. वानखेडे यांच्या गोरेगाव पश्चिमेकडील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या सी विंग मधील घरी सीबीआयची टीम पोहचली आहे. या टीम मध्ये ३ अधिकारी असून मागील दीड तासापासून छापेमारी सुरू आहे. एनसीबीच्या गुप्त अहवालाच्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.   (Breaking Marathi News)

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्यसह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश आहे.

कार्डिंक क्रूझ आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे आणि इतरांनी २५ कोटींची मागणी केली आणि ५० लाख खंडणी घेतल्याचा आरोप सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मेल यांनी एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये सना मलीक म्हणाल्या आहेत की, ''सत्य आणि सत्याशिवाय काहीही नाही.''

वानखेडे यांच्या सहकार्याला केलं सेवेतून बडतर्फ

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (NCB) तपास अधिकारी विश्वविजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. या अधिकाऱ्यानं आपल्या सहकाऱ्यांसह कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यामध्ये आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. पण सध्या त्यांच्यावर झालेली बडतर्फीची कारवाई दुसऱ्या प्रकरणात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT