Crime News:  Saam Tv
मुंबई/पुणे

कॅनरा बँक फसवणूक प्रकरणी फरार संचालकाला अटक; सीबीआयची कारवाई

कॅनरा बँकेचे २० कोटी रुपये बुडवून गेल्या १० वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांना चकवा देणाऱ्या गुजरातमधील व्यावसायिकाला अटक करण्यात सीबीआयला यश आले आहे.

सुरज सावंत

मुंबई - कॅनरा बँकेचे २० कोटी रुपये बुडवून गेल्या १० वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांना चकवा देणाऱ्या गुजरातमधील व्यावसायिकाला अटक (Arrest) करण्यात सीबीआयला (CBI) यश आले आहे. संजय राध्येलाल गुप्ता असे या आरोपीचे नाव आहे. संजय गुप्ता हा गेल्या १० वर्षांपासून केनियातील नायरोबी येथे वास्तव्याला असल्याचे बोलले जाते.

सीबीआय विशेष न्यायालयाने आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस व अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. शनिवारी संजय गुप्ता हा मुंबईत आला असता सीबीआयच्या पथकाने त्याला अटक करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

कॅनरा बँक, अहमदाबादचे उपमहाव्यवस्थापक मुकेश महाजन यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जून २०१२ मध्ये गुप्ताची कंपनी नोवा शिपिंग प्रा. लि., कंपनीचे संचालक किशोर पोशिया व जामनगर येथील ओम एक्झिम कंपनीचे मालक धर्मेंद्र लोहिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

शनिवारी सीबीआयच्या पथकाने मुंबईत न्यायालयापुढे गुप्ता यांच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. त्यावेळी १० वर्षांपासून आरोपीला शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले होते. गुप्ताला सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे. त्यामुळे याप्रकरणी नैरोबीमध्ये अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आल्याचे गुप्ताच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.

सरकारी वकिलांनी त्यास जोरदार विरोध केला. आरोपीला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि लुक आउट सर्कुलर (एलओसी) जारी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सीबीआयला आरोपींचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. आरोपी गुप्ताला आता अहमदाबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, SIT चौकशीदरम्यान छातीत दुखू लागलं; नंतर रुग्णवाहिका बोलावली

Ratnagiri Tourism : लाल दगड अन् ब्रिटिश काळातील तोफ, 'हा' किल्ला जपतोय सागरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक वैभव

Bigg Boss Marathi 6 Winner : मराठीनंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉस गाजवणार? स्वतः केला मोठा खुलासा

बोअरवेलफेम 50 तास मृत्यूशी झुंज देणारा प्रिन्स झाला 25 वर्षांचा

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील ६ आरोपींचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT