Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात कोयता घेऊन तरुणांची दहशत; अनेक गाड्यांची तोडफोड, गुन्हा दाखल

पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पुण्यातील (Pune) उत्तमनगर परिसरात वाढदिवसाला टोळक्याकडून कोयते फिरवत तसेच दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. येथे भर रस्त्यात टोळक्याकडून वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. यावेळी टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत गाड्यांची तोडफोड केली.

या प्रकरणी सचिन दिलीप राठोड(२४) याला अटक करण्यात आली असून, त्याचे साथीदार शुभम संदीप ठाकूर सोन्या खाडे, अक्षय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी या गुंडांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी (police) दिलेली माहिती अशी, संशयीत आरोपी शुभम ठाकूर याचा शिवशक्ती चौकात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. आरोपींचा परिसरातील काहींसोबत वाद झाला होता. वाढदिवस साजरा करत असताना टोळक्याकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT