Vasant More News, Sainath Babar News, Pune MNS News, Pune Latest Marathi News Twitter/@vasantmore88
मुंबई/पुणे

Pune: मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरेंवर गुन्हा दाखल, कारण...

पोलिसांना दोघांना हजर राहण्याचे आदेश काढले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) आणि नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पुणे महानगर पालिकेत (PMC) केलेलं आंदोलन दोघांना भोवले आहे. १७ मार्च रोजी महापालिकेत पाण्यावरून आंदोलन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना हजर राहण्याचे आदेश काढले आहेत. (Pune MNS News)

दोघेही पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याची माहिती मिळत आहे. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर दोघेही विविध प्रश्नांवरुन महापालिकते आंदोलन करत असतात. महापालिकेची मुख्य संभेमध्ये त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे दोनच मनसेचे नगरसेवक पुणे महापाकिते आहेत, परंतु ते आपल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. (Case filed against Sainath Babar & Vasant More)

वसंत मोरेंना नुकतंच शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. वसंत मोरेंना हटवून अध्यक्ष पदाची माळ साईनाथ बाबर यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. वसंत मोरेंना एक डॅशिंग नगरसेवक म्हणून देखील ओळखले जाते. आता वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना शिवाजीनगर पोलीस अटक करतात हे पाहावं लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT