Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

भयंकर ! पोलीस हवालदाराला कार चालकाने बोनेटवरुन फरफटत नेले, त्यानंतर...

डोंबिवलीत कारचालकाने एका रिक्षाचालकालाही धडक दिली, त्यानंतर...

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे (44) आपले कर्तव्य बजावत असतानाच एका कार चालकाने बोनेटवरून त्यांना फरफटत नेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (cctv footage) सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याचदरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकालाही धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. तसेच होरे (Traffic police injured) यांनाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (police fir filed) करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे ड्युटी करत होते. त्यावेळी त्यांना कारने धडक देत फरफटत नेले. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्या आवाजात स्पीकर लावला असल्याने पोलीस हवालदार होरे यांनी कार चालकाला थांबवण्यासाठी इशारा केला. त्यांना चालकाने होरे यांच्या अंगवार कार नेली. होरे यांनी कारचे बोनेट पकडले असता चालकाने होरे यांना चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT