Sanjay raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? आज जामीन अर्जावर सुनावणी

आज राऊतांना जामीन मिळणार का? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut News : शिवसेना नेते तसेच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगामध्ये आहेत. आज म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. माहितीनुसार, मुंबई सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. थोड्याच वेळात या सुनावणीला सुरूवात होणार असून आज राऊतांना जामीन मिळणार का? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे. (Sanjay Raut News Today)

सध्या संजय राऊत हे अर्थर रोड जेलमध्ये आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. मागील सुनावणीच्या वेळी राऊत यांच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण करत त्यांना जामीन देण्यात यावा अशी विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानंतर ईडीच्या वकिलांकडून न्यायालयात वेळ मागण्यात होती.

न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर याबाबतची सुनावणी १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, आज संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान आजच्या सुनावणीतत राऊत यांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Maharashtra News)

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

गोरेगावमध्ये गुरू आशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. कंपनीशी संबंधित प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी येथील एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला.

यामध्ये जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. तसेच, प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केल्याचेही समोर आले आहे. या पैशांचा स्त्रोत काय, याचा शोधही ईडी घेत आहे. या संपूर्ण घोटाळ्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT