Eknath Shinde
Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : वेदांता प्रकल्पावरून शिंदे एकटे पडलेत? दिल्ली दौऱ्यावर भाजपचा एकही नेता नाही!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eknath Shinde Latest News : महाराष्ट्रातून वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच महाराष्ट्राचे ३ लाख कोटीपेक्षा जास्त किंमतीचे प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पडून आहेत. आता या प्रकल्पाला मंजूरी मिळावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचा (BJP) एकही मंत्री नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Eknath Shinde News Today)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आपल्याच गटातील उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे सोबत असणार आहे. त्यामुळं शिंदे आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो.

याआधी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते. विशेष बाब म्हणजे या सर्व राजकीय भेटी होत्या. मात्र, जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडायचा प्रश्न आला तेव्हा शिंदे यांच्यासोबत भाजपचा एकही राज्यातील नेता नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Eknath Shinde vs BJP)

केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळं भाजपचा राज्यातील एखादा मंत्रीसोबत असताना महाराष्ट्रातील उद्योग धंद्यासंदर्भात भेटी गाठी घेणं अधिक सोप्पं झालं असतं. तसंच ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, त्या सोडवणे अधिक सोप्पं झालं असतं. मात्र, केंद्रातील नेत्यांसमोर महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री महाराष्ट्राच्या प्रश्न असताना या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात का आले नाही? हा मोठा प्रश्न आहे.

मुख्यमंत्र्यांनी फक्त त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना दिल्लीत आणून भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला काही वेगळा संदेश दिला आहे का? मुख्यमंत्र्यांचं भाजपचे मंत्री ऐकत नाही का? राज्याच्या मंत्रिमंडळातही दोन शक्ती स्थळ निर्माण झाले आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Today's Marathi News Live: जाहीर सभेत आमदार शहाजी बापू पाटलांची मतदारांना दमबाजी

Aaditya Thackeray Speech : 'कोल्हापुरात किती दिवस ठाण मांडणार?'; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Kalyan News : श्री शंकर महाराज मंदिरातील दानपेटी चोरीला; हातात शस्त्र घेतलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT