Maharashtra Cabinet Meeting  Saam TV
मुंबई/पुणे

Cabinet Meeting Decision : आमदार अपात्रता निकालाच्या काही तास आधीच मंत्रिमंडळ बैठक, शिंदे सरकारने घेतले महत्त्वाचे 9 निर्णय

Cabinet Meeting Decision : 'सत्यशोधक' मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली आहे.

प्रविण वाकचौरे

रुपाली बडवे

Cabinet Meeting Decision :

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाच बैठक आज पडली. आजच्या बैठकीत ९ महत्त्वाच निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच 'सत्यशोधक' मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

  • राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता. (महिला व बालविकास)

  • ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी. (ग्राम विकास विभाग) (Latest Marathi News)

  • शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी. (वित्त विभाग)

  • 'सत्यशोधक' मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी. (वित्त विभाग )

  • जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी. (दिव्यांग कल्याण विभाग)

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रुपये ५० हजारांवरून वरुन एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता. (ग्राम विकास विभाग)

  • महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार. (मदत व पुनर्वसन विभाग )

  • राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी. (अन्न व नागरी पुरवठा)

  • राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि ११०६४ सहाय्यभूत पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी. (विधी व न्याय विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : मनाला भुरळ घालणारा रत्नागिरीतील ट्रेकिंग स्पॉट, दिवाळीत ट्रिप प्लान करा

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूककोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, नेमकं कारण काय?

Budget Streaming: BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ₹३० मध्ये मिळवा OTT अ‍ॅक्सेस अन् मनोरंजनाची सुविधा

SCROLL FOR NEXT