Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis Latest News,  saam tv
मुंबई/पुणे

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, शपथ घेणारे पहिले १० मंत्री कोण?

शपथ घेणाऱ्या १० मंत्र्यांमध्ये कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 मंत्री घेणार शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे पाच तर आणि भाजपचे (BJP) पाच मंत्री घेणार शपथ घेणार आहेत. अधिवेशनाच्या तोंडावर असल्याने आधी10 मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असून त्यानंतर अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हे देखील पाहा -

या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता लवकरच शपथविधी पार पडणार आहे.

दरम्यान, १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक पार पाडणार आहे. तत्पूर्वी 'एनडीए'च्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा १४ जुलै रोजी मुंबई भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की १९ जुलै रोजी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे.

असे होईल खाते वाटप

गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील. तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT