Mumbai : राजकीय नेत्याने पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : राजकीय नेत्याने पैसे बुडवल्याने व्यावसायिकाची आत्महत्या

आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिलेल्या चिठ्ठीत खळबळजनक खुलासा केला असून आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या लोकांची नावे चिठ्ठीमध्ये लिहिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : चेंबूर या ठिकाणी एका कॅटरिंग व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यावसायिकांना आत्महत्या करण्याच्या अगोदर लिहिलेल्या चिठ्ठीत खळबळजनक खुलासा केला असून आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या लोकांची नावे चिठ्ठीमध्ये लिहिली आहे.

या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत. प्रकाश राठोड असे आत्महत्या करणाऱ्या कॅटरिंग व्यावसायिकाचे नाव आहे. ते चेंबर या ठिकाणील पांजरापोळ परिसरामधील रहिवासी आहे. मृत राठोड यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून, ते देवनार, चेंबूर आणि गोवंडी परिसरात विविध कार्यक्रमासाठी जेवण पुरवण्याचे काम करत होते.

हे देखील पहा-

संबंधित परिसरातील काही बड्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून अनेकदा जेवणाची ऑर्डर घेतली होती. पण जेवणाचे लाखो रुपयाचे बिल संबंधित राजकीय नेत्यांनी थकवले होते. नेमहीच बिल थकवल्याच्या कारणाने मृत प्रकाश राठोड हे कर्जबाजारी झाले होते. अनेकदा विनवणी करून देखील राजकीय नेते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.

यामुळे राजकीय नेत्यांच्या मुजोरीला कंटाळून प्रकाश राठोड यांनी देवनार या ठिकाणी एका हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना प्रकाश राठोड यांनी आत्महत्येअगोदरच लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे.

संबंधित चिठ्ठीमध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचे कारण लिहिले आहे. संबंधित देणे बुडवणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे यामध्ये लिहिली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गोवंडी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT