Building Slab Collapse in Nalasopara Saam Tv
मुंबई/पुणे

Slab Collapse: नालासोपऱ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारात घराचा स्लॅब कोसळून खाली पडलाय.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार: नालासोपाऱ्यात इमारतीचा छत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत, तर एकाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. मध्यरात्री घरातील सर्वजण झोपेत असताना ही घटना घडलीये (Building Slab Collapse in Nalasopara).

नेमकं काय घडलं?

नालासोपारा (Nalasopara) पश्चिमेला हनुमाननगर येथे ही घटना घडली. येथे मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारात घराचा स्लॅब कोसळून (Slab Collapse) खाली पडलाय या घटनेत घरातील चार व्यक्ती जखमी झाले आहेत, तर एकाची प्रकृती नाजूक आहे. रात्री घरातील सर्व कुटुंबीय झोपलेले असताना अचानक ही घटना घडली.

नालासोपारा पश्चिम येथील जयकृष्ण इमारतीत जाधव कुटुंब राहातं. ते रात्री झोपलेले असताना त्यांच्यावर घराच्या मोठा छताचा स्लॅब कोसळला. यामध्ये प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा घरात 8 जण असल्याची माहिती आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT