Thane News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना; फुटबॉल मैदानावर इमारतीचा पत्रा कोसळला, 7 जण जखमी

Upvan News: ठाण्यातील उपवन परिसरात हवेमुळे इमारतीचा पत्रा कोसळून फुटबॉल पडला. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत.

विकास काटे, ठाणे

येथील गावंडबाग परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या फुटबॉल टर्फच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून सात जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पडत असल्यास पावसामुळे ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी असून चार जण किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली.

ठाणे शहरात आज रात्री ९ नंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. तर उपवन परिसरात गावंड बाग येथील रौनक पार्क या इमारतीची शेड फुटबॉल टर्फवर कोसळून 7 जण जखमी झाले आहेत.

जखमी हे इयत्ता 9वी 10वी चे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हे विद्यार्थी फुटबॉल खेळत असताना पत्र्याची शेड उडून त्यांच्या अंगावर कोसळली.सदरचा प्रकार नंतर आता पुन्हा अश्या प्रकारे शेड चा प्रश्ण गांभीर् झाला आहे

दरम्यान, आज सकाळपासूनच ठाणे आणि नजीकच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात दहा ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे. यातच वर्तकनगर येथे घराची भिंत कोसळून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT