Kalyan Crime News
Kalyan Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

संतापजनक: रस्त्यावरुन जात असणाऱ्या भावा बहिणीला दारुड्यांकडून बेदम मारहाण; घटनेचा Video व्हायरल

प्रदीप भणगे

कल्याण : दारूसाठी चकणा आणून दिला नाही म्हणून एका अल्पवयीन तरुणाला आणि त्याच्या बहिणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. तसंच बहिण भावाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरलं झाला आहे. कल्याण (Kalyan) पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा सर्व धक्कादायक प्रकार घडला.

एका इमारतीखाली काही तरुण दारूची पार्टी करत होते. या दरम्यान रोहन हा तरुण आपल्या बहीणीसोबत काही कामानिमित्त रस्त्यावर जात होते. यावेळी पार्टी करणाऱ्या तरुणांपैकी एकाने रोहनला दहा रुपये दिले आणि दुकानातून चकणा आणून दे असं सांगितले. तर सोनाली यांनी आपल्या भावाला दुकानात जाऊ दिले नाही. याचा राग मनात ठेवून दारू पार्टी करणाऱ्या तरुणांनी रोहनला मारहाण करायची सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ -

शिवाय मध्यस्थी करायला गेलेली रोहनची बहीण सोनाली हिला देखील मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकारची घटना एका नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केली असून तो व्हिडिओ (Video) आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान या व्हिडिओची माहिती खडकपाडा पोलिसांना (Khadakpada Police) मिळताच त्यांनी या आरोपींचा शोध सुरू केला.या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : सलमान खानाच्या घरावर गोळीबार प्रकरण, पाचव्या आरोपीला ठोकल्या बेड्या

Bengal School Jobs Scam: लोकांचा विश्वासच उडेल! शिक्षक भरती घोटाळ्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांची तिखट टिप्पणी

Unseasonal Rain : चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

Mumbai Local : ठाकुर्ली- कल्याण दरम्यान पुन्हा अपघात; लोकलची धडक लागून एकाचा मृत्यू

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT